BREKING! सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा?

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद अचानक सोडल्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. पण राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष पवार कुटुंबियांकडून थेट घोषीत केला जाणार नाही, तर यासाठी नेमलेली समिती याबाबत निर्णय घेणार आहे.

पण शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे याच पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

तसे झाल्यास सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरणार आहेत. तसेच राज्यातील एखाद्या राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला अध्यक्षाही ठरणार आहेत.

Leave a Comment