साकूर पठार भागात खळबळ! गावतळ्यात तरूणाचा मृतदेह आढळला

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागातील शेंडेवाडी येथील गावतळ्यात एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह वार – रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दिपक लहानू हांडे ( वय २५ ) रा. शेंडेवाडी, ता. संगमनेर असे मृत युवकाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिपक हा घरात न सांगता निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. आज त्याचा मृतदेहच गावतळ्यात फुगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दिपक हांडे हा युवक शेंडेवाडी येथील रहिवासी आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून दिपक हा घरात न सांगता निघून गेला असल्याची चर्चा होती. मात्र दिपक कुठं गेला हे कुटुंबीयांना माहिती नव्हते. परंतु रविवारी सकाळी काही नागरिक गावतळ्याजवळून जात असताना त्यांना फुगलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसून आला. मात्र हा मृतदेह दिपक हांडेचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गावतळ्याजवळ ग्रामस्थांनी धाव घेतली. तसेच रूग्णवाहिकेला पाचारण करून दिपकचा मृतदेह संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Leave a Comment