मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

मुंबई : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या आजच्या दिवसाकडे लक्षं लागलेलं होतं. अशातच मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्यात आले आहे.

अर्थमंत्री काय म्हणाल्या

आजचा अर्थसंकल्प हा विकसित भारतासाठी आहे. १२ वर्षांपासून नियोजनबद्ध कारभार सुरू आहे. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढत आहे. लोकांचे जीवनमान सुधारण्याचे काम सुरू आहे. दारिद्र्य कमी करण्यावर यशस्वी ठरत आहोत. कृषी क्षेत्रावर भर देण्यात आला आहे .

शेतकऱ्यांना बजेटमधून काय मिळालं?

१) कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार.

२) मत्स्य उद्योगाला चालना देणार.

३) पशुपालन उद्योगाला चालना देणार.

४) मत्स्य पालनासाठी ५०० अमृत जलाशय तयार केले जाणार.

५) नारळ ,चंदन, काजूचे उत्पादन वाढवले जाणार.

६) भारताच्या काजू कोकोला जागतिक ब्रँड बनवणार.

७) शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक AI टूल तयार करणार.

Leave a Comment