मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा पसरलीय. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालीय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे झेडपी प्रचाराच्या सभा घेणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात ७ दिवसात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी २२ प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेडपीचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी त्यांच्या तीन सभा कोकणात होत्या. त्याच दिवशी सर्व सभा रद्द केल्या. यानंतर राज्यातल्या इतर सभाही रद्द केल्याची माहिती आता समोर येतेय. अजित पवार यांच्या निधनामुळे झेडपी प्रचार न करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय.
