मोठी बातमी! राष्ट्रवादीवर शोककळा, “या” दिग्गज नेत्याच निधन

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने 3 फेब्रुवारी रोजी निधन झाले.

त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात राजकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. ॲड. रविंद्र नाना पगार यांच्यावर बुधवार, 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता उत्राने, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे अंत्यविधी होणार आहे.

४० वर्षांचा संघटनात्मक अनुभव

ॲड. रविंद्र नाना पगार हे सन 2012 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांचे ते निकटवर्तीय सहकारी होते. त्यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

राजकारण व संघटनात्मक कामकाजाचा सुमारे 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी होता. याआधी एकत्र काँग्रेसमध्ये युवक काँग्रेस तसेच NSUI या विद्यार्थी संघटनांचे जिल्हाध्यक्षपदही त्यांनी यशस्वीरीत्या भूषवले होते.

1999 मध्ये शरद पवारांच्या समर्थनार्थ ऐतिहासिक मेळावा

सन 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राज्यात सर्वप्रथम नाशिक येथे मामा मुंगी मंगल कार्यालयात शरद पवारांच्या समर्थनार्थ मेळावा घेण्याचे धाडस ॲड. रविंद्र नाना पगार यांनी केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व. अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही, त्यांनी संपूर्ण संघटना एकसंघ ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Leave a Comment