राष्ट्रवादीला धक्का ; यांचा भाजपात प्रवेश

दौंड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे.

दौंड बाजार समितीच्या निवडणूक निकालानंतर मळद (ता. दौंड) येथील दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष मनोहर जाधव यांनी नुकताच राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला.

दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये दौंड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात जाधव यांनी भाजतात प्रवेश केला.

गावपातळीवरील स्थानिक निवडणुकांसह मोठ्या निवडणुकांमध्ये मळद हे नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य देणारे गाव ठरलेले आहे. मागील महिन्याभरातील हा दुसरा पक्षप्रवेश सोहळा या गावातून झाल्याने मळद राष्ट्रवादीला दुसरा हादरा बसला आहे.

यापूर्वी मोरे- भगतवस्ती येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार कुल यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला होता.

Leave a Comment