संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे एका शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वार – सोमवार दि. १६ मार्च रोजी घडलीय. सोपान उर्फ सिताराम मनोहर शेंडगे ( वय ४० ) रा. मांडवे बुद्रुक ता. संगमनेर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं सोपान शेंडगे यांनी आत्महत्या का केली? याबाबत कारण अस्पष्ट आहे.
