संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील लोकनेते स्व. अशोकराव बाजीराव पा. खेमनर उर्फ आबा यांच्या ६३ व्या जयंतीनिमित्त परंपरेनुसार यंदाही विविध उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. तसेच विद्या प्रबोधिनी प्रशालेत स्व. अशोकराव पा. खेमनर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन करताना उपस्थित मान्यवरही स्व. अशोकराव खेमनर यांच्या आठवणींनी हळहळून गेल्याच बघायला मिळाले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, दादाभाऊ खेमनर, सुभाष शेंडगे, मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठुराज मैड, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सागर, दिनकरराव भगत, सुदाम सागर, युवा नेते बाळासाहेब सागर, अनमोल खेमनर, पाराजी खेमनर यांच्यासह संस्थेचे रजिस्टर हेमचंद्र होळकर, प्राचार्य गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, इन्चार्ज कोळेकर व सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच स्व. अशोकराव खेमनर यांच्या जयंतीनिमित्त साकूर परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच यानिमित्ताने डॉ. पवन खेमनर यांच्या मातोश्री हॉस्पिटल, साकुर आणि अर्पण ब्लड बँक, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरही घेण्यात आले. विशेषतः रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत अशोकराव पा. खेमनर यांच्या वतीने एक केशर आंब्याचे रोप भेट देण्यात आले. रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व पार पाडले.
स्व. अशोकराव पा. खेमनर यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देणाऱ्या या कार्यक्रमातून परिसरातील शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठीचे प्रयत्न सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
