कॅप्टन अशोक खरात प्रकरणी वादात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले होते राजीनामा देण्याचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना वर्षा या निवासस्थानी बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ राजीनामा देण्यास सांगितलं होतं.
रुपाली चाकणकर यांनी पत्रात काय म्हटलं?
रुपाली चाकणकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले की, मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.
आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.
