मोठा राजकीय भूकंप….! शिंदे गटाचे सर्व मंत्री राजीनामा देणार…?

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत वाद आता टोकाला पोहोचला असून संतप्त झालेल्या शिंदेसेनेच्‍या मंत्र्यांनी थेट राजीनाम्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून योग्य कारवाई झाली नाही तर आम्ही राजीनामा देऊ, अशी भूमिका शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. सातत्याने आमची गळचेपी होत आहे यावर बोलले पाहिजे, अशी मागणी देखील शिवसेना आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिवसेना मंत्र्यांची नाराजी पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना साताऱ्यातील या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश शिंदेंनी आपल्या मंत्री आणि आमदारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Leave a Comment