बिग ब्रेकिंग! भारतात लॉकडाऊन लागणार का? मोठी अपडेट समोर 

कोरोनानंतर भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे बोलले जात आहे. देशात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. या सर्व चर्चा आणि अफवांनंतर आता केंद्र सरकारने महत्वाची अपडेट दिली आहे. लॉकडाऊन लावण्याचा असा कोणताही प्लान नाही. देशात लॉकडाऊन लागणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना दिलासा मिळाला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी देशात लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सध्या केंद्र सरकारच्या अजेंड्यावर कोविड-१९ सारखी कोणतीही देशव्यापी लॉकडाऊन करण्याची योजना नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणादरम्यान कोरोनाचा उल्लेख करण्यात आला त्यानंतर देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडियावर लॉकडाऊन लागणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

मंत्री हरदीप पुरी यांनी स्पष्ट केले की, देशात कोविड-१९ सारख्या लॉकडाऊनची कोणतीही योजना नाही. केंद्र सरकार सध्या अशा कोणत्याही कृतीचा विचार करत नाही.’ हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील यासंदर्भात भलीमोठी पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, ‘भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. मी हे स्पष्टपणे सांगतो की सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. अशावेळी आपण शांत, जबाबदार आणि एकजूट राहण्याची खूप गरज आहे.’

मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाले. पेट्रोल- डिझेल अन् एलपीसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी मिळणार नसल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यानंतर आला लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या. या अफवांनंतर मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आश्वासन दिले की, भारताची ऊर्जा परिस्थिती मजबूत आहे. इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होणार नाही यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना इंधन, ऊर्जा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. आम्ही पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.’

Leave a Comment