महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावर उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य म्हणाले….

Ujjwal Nikam : ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर भाष्य केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल ८ ते १२ मे या काळात येऊ शकतो. कारण, या घटनापीठातील काही न्यायमूर्तीची निवृत्ती लवकरच होत आहे. त्यामुळे, पुढील आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवणारा ठरू शकतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही पक्षाच्या वकिलांची बाजू ऐकून झाली असून सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठा आता निकालाच्या अंतिम टप्प्यावर आहे. पुढील आठवड्यात निकाल देण्याची शक्यता आहे. यावर, उज्ज्वल निकम यांनीही भाष्य केलंय.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निकाल कधी लागेल हे सध्या सांगणे अवघड असले तरी मात्र सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश, घटनापीठातील न्यायाधीश निवृत्त होणार असल्याने निकाल लवकर लागेल ही अपेक्षा, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

नाशिक येथे साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Leave a Comment