Vishwanath Mahadeshwar : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच निधन

Vishwanath Mahadeshwar Passed Away: मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच आकस्मिक निधन झालं आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रात्री 2 वाजता निधन झालं आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विश्वनाथ महाडेश्वर यांच निधन झालं आहे. आज दुपारी 2 वाजता वांद्रे येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून 4 वाजता अंत्ययात्रा निघेल.

2002 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवडून आले. 2003 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 2007 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले. 2012 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले. तर 2017 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांची निवड झाली.

Leave a Comment