अहमदनगरच्या नामांतराबाबत मोठी बातमी

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव’ या जिल्ह्यांचं नामांतर झाल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी जोर धरू लागली आहे.

विशेष म्हणजे यावेळी थेट अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांनीच नामांतराची मागणी केली आहे. स्वप्निलराजे होळकर यांनी अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करावे, अशी मागणी केली आहे.

महाराज यशवंतराव होळकर यांचे वंशज स्वप्निलराजे होळकर यांच्या नेतृत्त्वात महाराज यशवंतराव होळकर यांची शौर्ययात्रा पुणे ते इंदौर काढण्यात आली.

यावेळी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. पुणे ते इंदौरपर्यंत काढण्यात आलेल्या यात्रेतून तरुण पिढीला प्रेरणा मिळावी आणि यशवंतराव होळकर यांनी केलेल्या कार्याची ओळख व्हावी, यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचं स्वप्निल राजे होळकर यांनी सांगितलं.

Leave a Comment