संगमनेर – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावून वधू वरांना शुभेच्छा दिल्या. भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देताना त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या लेकीला आणि जावयाला खास गिफ्ट दिले. देशमुख कुटुंबाची वारकरी परंपरेची अर्थात अध्यात्माची पार्श्वभूमी लक्षात घेता एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल-रखुमाईची सुंदरशी मुर्ती भेट देऊन वधूवरांना सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या.
इंदुरीकर महाराजांनी आजवरच्या असंख्य कीर्तनातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या लेकीच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहता आले, याबद्दल आनंद आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल इंदुरीकर महाराजांनी त्यांचे आभार मानले. शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मानही केला.
