राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. विकास लवांडे यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या ओतण्यात आल्या. यावेळी धमकीही देण्यात आल्याचे लवांडे यांनी सांगितले आहे. या शाईफेकीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादी प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणारे संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर या दोघांनी शाई फेक केली होती. 1959 च्या शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
