संगमनेर – विद्या प्रबोधिनी प्रशालेचा दहावीचा १०० टक्के निकाल 

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकुर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्था संचलित विद्या प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यंदाच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत विद्या प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के लागला असून निकालात दबदबा कायम राखला आहे.

दहावीच्या परीक्षेत विद्यालयातील कु. समिक्षा बंडू भुजबळ हिने ९२.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच साकूर केंद्रातही अव्वल स्थान मिळविले. तसेच कु. अनुपमा सुभाष घुगरकर हिने ८७ टक्के गुण मिळवत द्वितीय, कु. स्वस्ती राहुल तिरवाडी हिने ८५ टक्के गुण मिळवत तृतीय, चि. साई जितेंद्र गाडेकर व कु. वैष्णवी पोपट सागर यांनी ८३.२० टक्के गुण मिळवत चतुर्थ, तसेच कु. वैष्णवी गणेश पवार हिने ८१.६० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवला आहे. तसेच दहावीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यालयातील ८२ विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीने व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळ हा उल्लेखनीय निकाल साध्य झाला आहे.

दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत खेमनर, उपाध्यक्ष शंकरराव खेमनर व सर्व संचालक मंडळ, सेक्रेटरी, रजिस्ट्रार, प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व समस्त ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Leave a Comment