मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मनोबल उत्तम राहील.
वृश्चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
धनु : काही कामे धाडसाने पार पाडाल. मन आनंदी व आशावादी राहील.
मकर : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मीन : शासकीय कामे पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.
