पठारभागातील सर्वसामान्यांचे आशास्थान – युवा नेते बाळासाहेब सागर

संगमनेर (DSNews24 /किरण पुरी) हरिश्चंद्रगड गडावरून उगम पावणाऱ्या मुळामाईंच्या नदी किनारी वसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील कै. बापूराया पाटीलबा सागर यांचे नातू व प्रगतशील शेतकरी श्री. भाऊसाहेब बापूराया सागर यांचे चिरंजीव श्री. बाळासाहेब भाऊसाहेब सागर होय. केवळ पैसा असून चालत नाही, तर विचारात दूरदृष्टी आणि कामात तळमळ असावी लागते. युवा नेते बाळासाहेब भाऊसाहेब सागर यांनी आपल्या अथक परिश्रमातून हे सिद्ध केले आहे. समाजकार्याची आवड आणि लोकांप्रती असलेली कणव त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरवते.””युवकांना दिशा देणारा, संकटात आधार बनणारा आणि विकासाचे राजकारण करणारा खरा युवा नेता म्हणजे बाळासाहेब सागर होय. आज १२ मे रोजी त्यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त DSNews24 ने घेतलेला थोडक्यात परिचय.

श्री. बाळासाहेब सागर यांचा थोडक्यात जीवन परिचय

संगमनेर तालुक्यातील साकूर येथे प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब बापूराया सागर व सुमन भाऊसाहेब सागर यांच्यापोटी सन १२ मे १९८९ रोजी बाळासाहेब सागर यांचा जन्म झाला. आई वडीलांनी बाळासाहेबांना एक उच्चशिक्षणापर्यत शिकवल. २००८ साली बाळासाहेब सागर यांनी फार्मसिस्टमध्ये शिक्षण पुर्ण केले. मात्र आजोबा कै. बापूराया पाटीलबा सागर यांनी जीवनभर केलेल्या समाजसेवेचा वारसा वडिल भाऊसाहेब सागर यांच्यासोबत बाळासाहेब सागर यांना लाभला गेला. त्यामुळे लहानपणापासूनच फक्त नी फक्त समाजकारण करत राहिले. साकूर बाजारपेठेत बाळासाहेब सागर यांनी व्यावसायात पाऊल टाकत साईसागर मेडीकल नावाने दूकानाचा सन २०११ साली शुभारंभ केला. यादरम्यान बाळासाहेब सागर यांचे चुलत बंधू बाबाजी हरिभाऊ सागर यांची साकूर पठार भागात मोठी क्रेझ दिसून येत होती. त्यामुळे सागर कुटुंबियांच एक मोठा नावलौकिक तेव्हाही होता आणि आजही आहे. बाळासाहेबांचे बंधू बाबाजी सागर यांच्या संकल्पनेतून

धार्मिक कार्यक्रमांमध्ये कायमच सागर आग्रही

साई श्रद्धा गृपची स्थापना करण्यात आली. या गृपच्या माध्यमातून पठार भागात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये युवा नेते बाळासाहेब सागर यांच प्रत्येक ठिकाणी मोलाचं सहकार्य लाभत गेले. तसेच साई श्रद्धा गृपच्या माध्यमातून दरवर्षी साकूर ते शिर्डी साईबाबा पायी दिंडी बाबाजी सागर व सहकार्यांनी सुरू केला. जवळपास पंधरा वर्षांपासून ही अविरत पायी दिंडी सुरू आहे. या दिंडीत शेकडो साईभक्त सहभागी होत असतात. यासाठी युवा नेते बाळासाहेब भाऊसाहेब सागर मोलाचं सहकार्य करत आहे. तसेच साकूरमध्ये दरवर्षी शिवजयंती उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम असो, व्याख्याने आदि विविध उपक्रम बाबाजी सागर व बाळासाहेब सागर सहकाऱ्यांसोबत राबवत आहे.

कै. बापूराया पाटीलबा सागर यांचा वारसा जपला

साकूरसह पठार भागातील कोणताही कार्यक्रम असो. प्रत्येक ठिकाणी बाबाजी सागर, बाळासाहेब सागर उपस्थित राहून मदत करण्याच काम करत आहेत. गोरगरीबांना कसलीही अडचण आली तरी काही सेकंदात सोडविण्याच काम बाळासाहेब सागर करत आहे. कारण राजकारण कमी आणि पुर्णवेळ समाजकारण करणे हेच बाळकडू बाळासाहेब सागर यांना त्यांचे आजोबा कै. बापुराया पाटीलबा सागर तसेच वडिल भाऊसाहेब सागर यांच लाभल आहे. सर्वांच्या सुखदुःखात बाळासाहेबांचे वडिल कायमच पुढ असतात. आधी समाज नंतर आपलं कुटुंब हाच उद्देश ठेवून भाऊसाहेब सागर आपलं प्रामाणिकपणे काम पठारभागात करत आहे. तसेच ते कै. अशोकराव पा. खेमनर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या विचाराने काम करत आहे. तोच विचार आता युवा नेते बाळासाहेब सागर पुढे नेत आहेत.

सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारे सागर कुटुंब 

युवा नेते बाळासाहेब सागर तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा पठार भागात मोठा दबदबा आहे. कारण सर्वात मोठं सागर कुटुंब समजले जात आहे. सर्व क्षेत्रात अग्रेसर असलेले हे कुटुंब आहे. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक असो तसेच गोरगरीब नागरिकांना मदत करण्यात सागर कुटुंब सर्वात पुढ असते. तसेच कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्नदान करण्यासाठी सागर कुटुंबियाचा मोलाचा वाटा असतो.

पठार भागातील प्रगतशील शेतकरी म्हणून सागर कुटुंबियांची ओळख

साकूर पठारभागात शेती व्यवसायात प्रगतशील शेतकरी म्हणून सागर कुटुंबियाची मोठी ओळख आहे. सागर कुटुंबियातील हरिभाऊ बापूराया सागर, शिवाजी बापूराया सागर, अशोक बापूराया सागर, भाऊसाहेब बापूराया सागर ही चार भावंड अत्यंत नियोजनबद्ध शेती व्यवसाय करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे एकत्र कुटुंब नियोजन आहे. त्यामुळे त्यांची वज्रमूठ भक्कम बनली आहे. नुकताच ऊसाच विक्रमी उत्पादन काढल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हरिभाऊ बापूराया सागर यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले होते. त्यासोबतच साकूरमध्ये सागर कृषी, सागर किराणा, साईसागर मेडिकलचे व्यावसाय आहे. तसेच सागर कुक्कुटपालनासह विविध व्यवसायात हे कुटुंब अग्रेसर आहेत. शेतकऱ्यांना सागर कुटुंब योग्य मार्गदर्शन करतात. तसेच राजकारणात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आजतागायत सागर कुटुंबिय एकनिष्ठपण काम करत आहेत.

समाजकारणातच रस

तरुणांच्या मनात धडकी भरवणारे आणि सर्वसामान्यांची आशा असलेले युवा नेतृत्व म्हणून बाळासाहेब सागर यांची पठार भागात ओळख निर्माण झाली आहे. त्यांना समाजकारण करण्यातच रस आहे. कारण ती त्यांची आवड आहे. दरम्यान पठारभागात खेळाडू तयार होण्यासाठी त्यांनी स्वतः व इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन क्रिकेट स्पर्धा सुरू केल्या. पठार भागातील युवक कशातच कमी पडू नये असा उद्देश त्यांचा होता.

जमीनीवर असणारा युवा नेता

तसेच अलीकडच्या काळात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे व संगमनेर तालुका युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते बाळासाहेब सागर यांना काम करण्याची संधी मिळाली. तसेच त्यांच्यावर संगमनेर तालुका युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. कारण आगामी जिल्हा परिषद निवडणूकीसाठी बाळासाहेब सागर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र बाळासाहेब सागर यांनी आपला स्वभाव बदलला नाही, जमीनीवर राहूनच ते आजही जनतेची सेवा करत आहे. वडिल भाऊसाहेब सागर व चुलते सुदाम सागर यांनी देखील कै. अशोकराव खेमनर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या सोबत राहून एकनिष्ठ काम करत आहेत.

बंधू रामदास व बाबाजी सागर यांची खंबीर साथ

बंधू रामदास भाऊसाहेब सागर व बाबाजी हरिभाऊ सागर यांची खंबीर साथ लाभली असून बाळासाहेब सागर यांनी आपले पुढच लक्ष्य निश्चित केले आहे. या सर्व गोष्टींमध्ये खरी साथ लाभते ते पत्नीची. बाळासाहेब सागर यांना पत्नी रेखा बाळासाहेब सागर यांची मोलाची साथ लाभत आहे. एखाद्या कार्यात आपल्या पतीसाठी पत्नी जशी खंबीरपणे उभी राहते तसेच रेखा सागर या बाळासाहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत.

संयमी, शांत, स्वभाव

बाळासाहेब सागर यांचा स्वभाव अत्यंत संयमी, शांत असा आहे. कारण राजकारणात हेच महत्त्वाचे असते. मात्र बाळासाहेबांनी तेच पारखून राजकारणात पाऊल टाकले आहे. विशेषतः त्यांचा मित्र परिवार अफाट असून त्यांची देखील मोलाची साथ त्यांना ऐनवेळी लाभणार आहे. त्यामुळे बाळासाहेब सागर सध्या एक मजबूत बनले आहे.

युवकांचे मार्गदर्शक बाळासाहेब सागर 

विशेषतः सर्वांना सोबत घेऊन कसे जायचे हे त्यांना चांगलच माहिती आहे. तसेच ते एक योग्य विचार मांडणारे उच्चशिक्षित आहे. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन अश्रृ पुसणारे बाळासाहेब सागर आहे. युवकांना त्यांच योग्य सुचक मार्गदर्शन कायम असतं. आपल कुटुंब आपली जबाबदारी हे वाक्य ते युवकांना कायम सांगत असतात. बाळासाहेब सागर हे विचारवंत व्यक्तीमत्व आहे. अशा या नव्या उमलते नेतृत्व श्री. बाळासाहेब भाऊसाहेब सागर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शब्दांकन – संपादक किरण पुरी 

Leave a Comment