मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तूळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
वृश्चिक : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
मीन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
