संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील हिवरगाव पठार जवळील गिर्हेवाडी येथील आदिवासी शेतकरी मच्छिंद्र झुंबर दुधवडे या 35 वर्षीय तरुणाचा दि. २७ मे रोजी मोटरसायकलवर जात असताना अंगावर वीज पडुन जागीच मृत्यु झाला. ही घटना समजताच आमदार अमोल खताळ यांनी तातडीने पंचनामा करण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या होत्या.
त्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी गिर्हेवाडी येथे जात दुधवडे कुटुंबियांची भेट घेतली. तसेच दुधवडे कुटुंबियांच सांत्वन करत धीर दिला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी नैसर्गिक आपत्तीमधुन दुधवडे कुटुंबियांना शासनास्तरावरून शक्य तितके सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देत आपण भक्कमपणे दुधवडे कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजपा तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, भाजपा कायदा सेलचे जिल्हा संयोजक ॲड. अमित धुळगंड, आदिवासी समाजाचे नेते रामदास गोंदके, बाळासाहेब वनवे, राजु गोसावी, जनार्दन नागरे आदि उपस्थित होते.
