मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
तूळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.
धनू : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.
मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
कुंभ : नवीन परिचय होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
