बोटा (ता. संगमनेर) : विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बोटा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून अभियांत्रिकी पदवी, पदव्युत्तर तसेच डिप्लोमा स्तरावरील विविध नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राहुल एम. मुळजकर यांनी दिली.
महाविद्यालयात सध्या पदवी स्तरावर सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS) तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
पदव्युत्तर (एम.ई.) स्तरावर सिव्हिल इंजिनिअरिंग (स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग), कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.
डिप्लोमा विभागात सध्या सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम सुरू असून, नव्याने ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे.
सर्व नवीन तसेच विद्यमान अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली तसेच तंत्रशिक्षण संचालनालय (DTE), मुंबई यांची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती व शैक्षणिक सवलतींचा लाभ उपलब्ध होणार आहे.
या नवीन अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण घेण्याची तसेच रोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी प्राप्त करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे प्राचार्य डॉ. राहुल एम. मुळजकर यांनी सांगितले.
विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. रामदास पोखरकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सौ. विद्युलता पाटील यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आवाहन केले की, संस्थेत उपलब्ध असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या ध्येयाला या नवीन अभ्यासक्रमांमुळे अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
