नाट्यमय घडामोडीनंतर अखेर प्राजक्त तनपुरे बिनविरोध, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार घेण्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार गोंधळ उडाला होता. मात्र अखेर नाट्यमय घडामोडीनंतर भाजपा उमेदवार प्राजक्त तनपुरे बिनविरोध झाले आहेत. तर सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी काढलेल्या समजुतीनंतर दत्ता पानसरे यांनी माघार घेतली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अहिल्यानगरमध्ये बाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुर यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवार करण ससाणे, कमलेश गांधी यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे प्राजक्त तनपुरे (Prajkta Tanpure) यांची बिनविरोध निवड होण्यासाठी दत्तात्रय पानसरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे आवश्यक होते. परंतु त्यांनी स्वतः उमेदवारी अर्ज माघारी घेतला नव्हता. त्यांच्या प्रतिनिधीने उमेदवारी अर्ज माघार घेतला होता. त्याला पानसरे यांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार गोंधळ उडाला होता.

मात्र अखेर महाविकास आघाडीचे एकमत न नसल्याने काँग्रेसचे करण ससाणेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय पानसरे यांनीही अपक्ष अर्ज भरला होता. तर निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा पहिल्या दिवसापासून सुरु असलेला प्रयत्न यशस्वी झाला आहे. मात्र अपक्ष दत्तात्रय पानसरे यांचा अर्ज सूचकाने माघारी घेतल्याने पानसरे यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले होते.

प्राधिकृत पत्रावर मी स्वाक्षरी केली नाही त्यामुळे माझा अर्ज माघार होऊ शकत नसल्याचा दावा करत अर्ज माघार झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र पानसरे यांची सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी समजूत काढल्याने पानसरेंनी भूमिका बददली. भूमिका बदलल्याने अखेरकार प्राजक्त तनपुरेंची बिनविरोध निवड झाली.

Leave a Comment