पारनेर(DSNews24 /किरण पुरी) कर्जमाफीसाठी फडणवीस सरकारने काढलेला शासन आदेश फसवा आहे. कर्जमाफी आदेशात अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आल्या असून त्या तातडीने रद्द करण्यात याव्यात अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा प्रवक्ते सुभाष करंजुले यांनी दिला आहे.
कर्जमाफीत शेतकऱ्यांच्या या फसवणुकी विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. फडणवीस सरकारने कर्जमाफीचा शासन निर्णय काढून राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याने या निषेधार्थ भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा संघटक संतोष वाबळे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुक्यातील म्हसणे – सुलतानपूर येथे कर्जमाफी शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी फडणवीस सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत जाहिर निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तसेच फडणवीस सरकारने कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या अटी रद्द करा, कुठलीही अट न लावता सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी संतोष वाबळे म्हणाले की, सरकारने कर्जमाफी करताना, २०१९ मध्ये कर्जमाफी घेतलेले शेतकरी, जरी ते यावेळी थकित असले तरी त्यांना केवळ ५० हजार रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ ५० हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यांनाही किमान दोन वर्ष नियमित कर्जदार असणे ही अट टाकण्यात आली आहे. अत्यल्प पगारावर राबणाऱ्या सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन द्यायचे आणि आता २ लाख कर्ज माफ करणार सांगून बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ ५० हजारावर बोळवणूक करायची ही अत्यंत संतापजनक गोष्ट असून ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक असल्याची टीका भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक संतोष वाबळे यांनी केली.
या आंदोलनावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळशिराम पायमोडे, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, तालुका सचिव अन्सार पटेल, वसंत साठे, बापु गट ( मेजर ), गोरख पठारे, धोंडीभाऊ गुंड, बाळासाहेब जंबे, आनंदा गुंड, दामोदर गुंड, दादाभाऊ बालवे, लक्ष्मण पठारे, पोपट जंबे, हरिभाऊ गुंड, सुरेश गुंड, बापू गुंड, रामदास बालवे, पोपट पालवे, रोहन पठारे, संतोष तरटे,दगडू तरटे, साहेबराव बागल, संदीप जंबे, मल्हारी रनशुर, बबन जंबे, बाबाजी पठारे, गंगाधर बालवे, सतीश बागल, सुनील बालवे, शिवाजी बालवे, शिवाजी जंबे, कैलास गुंड, रावसाहेब जंब यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
