हवामान अंदाज काय? राज्यात पुढील ७ दिवस….

पुणे – पावसासाठीचे पोषक वातावरण तयार झालं नसल्याने पुढील ६ ते ७ दिवस मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहील आणि पावसाची कुठला ही अलर्ट नसल्याची माहिती पुणे वेधशाळेने आज दिलीय.

गेल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानंतर गेल्या २ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील ७ दिवस राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक असा हलक्या सरींचा पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यातील पुढील ७ दिवसांमध्ये वातावरण आणि पावसाचा प्रवास कसा असणार आहे.

पावसाची विश्रांती, आर्द्रता वाढली

महिन्याच्या सुरुवातील मुंबईसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसराला तूफान पावसाने झोडपून काढले. मात्र मागच्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबई आणि परिसरातील वातावरणात आर्द्रता वाढली आहे. पुढच्या आठवड्यात पारा 33 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment