ऑप्युलन्स स्कूलचा शिष्यवृत्ती परीक्षेत दणदणीत जलवा ; १०० टक्के निकालाची परंपरा कायम

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील बाबासाहेब कुटे यांच्या ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशनने शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल कामगिरीमुळे शाळेने तालुक्यात मानाचा तुरा रोवला आहे.

यामध्ये कु. आरोही सुनिल कांबळे हिने २९८ पैकी २५६ गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. याशिवाय चि. वीर अशोक खेमनर याने २३० गुण मिळवत द्वितीय क्रमांक, कु. अयात हैदर पटेल हिने २२४ गुण मिळवत तृतीय क्रमांक, चि. पार्थ सहदेव जाधव याने २१० गुण मिळवत चतुर्थ क्रमांक, चि. आरूष विवेक खेमनर याने १९८ गुण मिळवत पाचवा क्रमांक, चि. अझैन फिरोज तांबोळी याने १९८ गुण मिळवत सहावा क्रमांक, तर चि. रूद्र मच्छिंद्र खेमनर याने १५६ गुण मिळवत सातवा क्रमांक प्राप्त केला.

तसेच इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कु. श्रेजल रविंद्र गवळी हिने २९८ पैकी १८२ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला तर चि. मुज्जमील वसीम शेख याने १७४ गुण मिळवत द्वितीय व कु. प्रगती अशोक कुदनर हिने १४२ गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे ऑप्युलन्स स्कूल ऑफ एज्युकेशनचे शैक्षणिक गुणवत्ता व उत्कृष्ट मार्गदर्शन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला व शुभांगी बच्छाव, वृषाली बेलकर, तृप्ती मोकळ, रेश्मा केंगार, आफरीन तांबोळी, स्वप्निल खैरनार या शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे ऑप्युलन्स स्कूलचे अध्यक्ष बाबासाहेब कुटे तसेच मुख्याध्यापिका सुरेखा पवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment