भिवंडी येथील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ८ वर पोहोचली असून घटनास्थळी अद्यापही भीतीचे सावट कायम आहे. अग्निशामक दल आणि बचाव पथकांकडून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जसजसा ढिगारा बाजूला केला जात आहे तसतसा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली एक लहान मुलगा अडकल्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने बचावकार्य अधिक खबरदारीने आणि वेगाने चालवले जात आहे. या दुर्घटनेतील अडकलेल्या इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पथके कसून प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
भिवंडी शहरातील भंडारी कम्पाउंड भागात घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेनंतर घटनास्थळी बचावकार्य अत्यंत वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ (NDRF) आणि टीडीआरएफ (TDRF) च्या जवानांकडून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर चालवले जात आहे.
ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेतय जशी शोधमोहीम पुढे सरकत आहे तसतसा मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण ढिगारा पूर्णपणे बाजूला केल्याशिवाय आणि शोधमोहीम संपल्याशिवाय दुर्घटनेतील एकूण जीवितहानीचा स्पष्ट आकडा समोर येऊ शकणार नाही, असे बचाव पथकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
