बोटा – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्या निकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बोटा येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी (B.E.) तसेच पदव्युत्तर अभियांत्रिकी (M.E.) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे महाविद्यालय AICTE, नवी दिल्ली व DTE महाराष्ट्र मान्यताप्राप्त असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.
महाविद्यालयात बी.ई. अभ्यासक्रमांतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS) तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध आहेत.
पदव्युत्तर (M.E.) अभ्यासक्रमांतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग (डिझाईन इंजिनिअरिंग), सिव्हिल इंजिनिअरिंग (स्ट्रक्चर्स इंजिनिअरिंग) आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखांसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. एम.ई. प्रवेशासाठी GATE पात्र तसेच प्रायोजित (Sponsored) उमेदवार पात्र असून प्रवेश प्रक्रिया GATE/CAP नियमानुसार राबविण्यात येत आहे.
महाविद्यालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, संशोधन व नवोपक्रमाला प्रोत्साहन, आधुनिक पायाभूत सुविधा आणि उत्कृष्ट प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी DTE FC सेंटर क्रमांक ५४०८ येथे विद्यार्थ्यांना पर्याय भरणे, कागदपत्र पडताळणी तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल मुळजकर यांनी सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण, संशोधनाभिमुख वातावरण आणि उद्योगस्नेही कौशल्ये ही काळाची गरज आहे. विद्या निकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांनी बी.ई. तसेच एम.ई. प्रवेश प्रक्रियेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
