सिन्नर तालुका दशनाम गोसावी समाज संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

सिन्नर – श्री दशनाम गोसावी समाज संस्था, सिन्नर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 26 वा विद्यार्थी गुणगौरव सोहळा सिन्नर येथील वारकरी भवनात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ गोसावी होते. प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय दशनाम गोस्वामी महासभेचे राष्ट्रीय सचिव ए. जी. गोसावी, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त श्याम गोसावी, समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनुप गोसावी, स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी, श्री गुरु शंकराचार्य समाज सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, गोसावी सेनेचे राज्याध्यक्ष कैलास गोसावी, समाज संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश गोसावी, संजय गोसावी, माजी अध्यक्ष भानुदासपुरी गोसावी, राजेंद्र गिरी, रतनपुरी गोसावी, दिलीप गोसावी, रविंद्र गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चौथी, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह दहावी, बारावी, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांत यशस्वी नियुक्ती मिळविलेल्या समाजबांधवांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, रोख बक्षिसे आणि शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने केशव गोसावी तसेच जिल्हा व तालुका समाज संस्थेच्या वतीने पाच सायकलींचे वितरण करण्यात आले. दौलत गोसावी यांनी स्मृतिचिन्हे, राजेंद्र भास्करपुरी यांनी शैक्षणिक साहित्य, तर ए. जी. गोसावी, लालगिरी गोसावी, काशिनाथ गोसावी आणि कमल गोसावी यांनी रोख बक्षिसांचे वितरण केले.

याशिवाय प्रवीण गोसावी (पाटोळे), गुलाब गोसावी (चास), डॉ. अशोक गोसावी (नाशिक), शरद गोसावी (सिन्नर), दीपक भारती (कणकोरी), दिनकर गोसावी (मानोरी), दत्तात्रय बन (मुसळगाव), सविता गोसावी (दापूर), पंडित गोसावी (भोकणी), योगेश गोसावी (पाटोळे), उत्तम गोसावी (देवपूर), संजय गिरी (नांदुरशिंगोटे), सुजित गोसावी, सुभाष गोसावी (सिन्नर), संजय गोसावी (नाशिक रोड), बाळासाहेब गोसावी (नाशिक), रामभारती गोसावी (सोनांबे), दीपक गोसावी (हिवरे), दिगंबर पुरी (पारनेर), रतनपुरी गोसावी (नांदुरशिंगोटे), ज्ञानेश्वर गोसावी (शिंदेवाडी), विजय गोसावी (सिन्नर), सोमगीर गोसावी (शिंदेवाडी), सुनिल गोसावी आणि शोभा भारती (सिन्नर) यांनी रोख स्वरूपात देणगी देऊन उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमानंतर भैरवनाथ गोसावी, छगन गोसावी, ब्रह्मगिरी गोस्वामी आणि सुरेश गोसावी यांच्या वतीने उपस्थित विद्यार्थी, पालक व समाजबांधवांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सरचिटणीस वसंत गोसावी यांच्यासह दौलत गोसावी, छगन गोसावी, गुलाब गोसावी, शरद गोसावी, राजेंद्र गोसावी, विजय गोसावी, सौ. स्वाती गिरी आणि सौ. सविता गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस वसंत गोसावी यांनी केले. समाजातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा, गुणवंतांचा गौरव करणारा आणि शिक्षणाला नवी दिशा देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Comment