शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार व नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात अवमानकारक व्यक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालाय.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात बोलताना संजय राऊत यांनी अवमानकारक व अपशब्द (शिवीगाळ) वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी संजय राऊत यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
मनीष केत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. कलम ३५६(२) (मानहानी/अवमानकारक वक्तव्य करणे), कलम ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे/अपशब्द वापरणे) यांतर्गंत राऊतांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. याप्रकरणी सोलापूरचे फौजदार चावडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
