सुप्रीम कोर्टात शिवसेना चिन्ह आणि पक्षाची सुनावणी संपली, सर्वात मोठी अपडेट समोर 

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील आज सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही सुनावणी उद्या म्हणजेच बुधवारी 5 ऑगस्टला होणार आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 रोजी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देताना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही दिलं आहे. याच निर्णयाला उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.

सुप्रीम कोर्टात तीन मिनिटात संपली सुनावणी

सुप्रीम कोर्टात आज दुपारी 4 पर्यंत हे प्रकरण सुनावणीसाठी येईल असं वाटलं होतं. मात्र प्रकरण उशीरा बोर्डावर आलं. प्रकरण सुनावणीसाठी आलं असता सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचं खंडपीठ होतं. सरन्यायाधीशांनी आपण यावर उद्या सुनावणी घेऊया का? अशी विचारणा केली.

त्यावर उद्धव ठाकरेंच्या वतीने बाजू मांडणारे वरिष्ठ वकील कपिल सिबल म्हणाले, हो, आम्हाला थोडा वेळ हवा आहे. जर उद्या यावर प्राधान्याने सुनावणी घेता आली तर पाहावे. कपिल सिब्बल यांच्या विनंतीवर सरन्यायाधीशांनी आम्हाला आधी ‘मिसलेनियस’ (इतर) प्रकरणे पहावी लागतील असं सांगितलं

त्यावर सिबल यांनी उद्या आम्हाला फक्त थोडा वेळ द्या. दुपारी 2 वाजता. जेणेकरून यावर सुनावणी घेता येईल अशी विनंती केली. यानंतर सुप्रीम कोर्टाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे.

Leave a Comment