साकूर पठार भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

संगमनेर(DSNews24 ) तालुक्यातील साकूर पठार भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला गती देत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाप्रमुख सचिन कोते, तालुकाप्रमुख अमरजी कतारी व संपर्क प्रमुख सुर्यकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व संगमनेर तालुका विधानसभा तालुका प्रमुख योगेश खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली पठार भागात नवीन नियुक्त्यांनुसार एकनाथ बळवंता खेमनर यांची शिवसेना कोर कमिटीच्या तालुका अध्यक्षपदी, किशोर म्हतारबा तरंगे व जनार्दन रामदास नागरे यांची उपतालुका प्रमुखपदी, प्रसाद रामदास धुळगंड यांची साकूर गटप्रमुखपदी, शिवाजी लहानू बाचकर यांची तालुका समन्वयकपदी, तुषार किसन सागर यांची साकूर गणप्रमुखपदी आणि बाबाजी दातीर यांची पिंपळगाव गणप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमुळे साकूर पठार भागातील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. तसेच संगमनेर विधानसभा तालुका प्रमुख योगेश खेमनर यांच्या नेतृत्वाखाली संघटन बांधणीचे काम प्रभावीपणे सुरू असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने तयारीला वेग दिला आहे.

विशेषतः येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, गावागावांत संघटन मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहिती विधानसभा तालुका प्रमुख योगेश खेमनर यांनी दिली.

Leave a Comment