जिल्हा बँक निवडणुकीत संगमनेरमधून गणपतराव सांगळे, रणजितसिंह देशमुख यांचे उमेदवारी अर्ज

अहिल्यानगर (DSNews24/किरण पुरी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस होता. संगमनेर तालुक्यातून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. अखेर VJNT (विमुक्त जाती–भटक्या जमाती) मतदारसंघातून गणपतराव सांगळे, तर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी – संगमनेर मतदारसंघातून रणजितसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. दोघांनीही आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

रणजितसिंह देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संगमनेर तालुका सहकारी दूध संघ (राजहंस)च्या चेअरमनपदाचा रीतसर राजीनामा दिला आहे.

सांगळे आणि देशमुख यांना सहकार क्षेत्रातील अनुभव असल्याने त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे. शेतकरी व सभासदांचे हित, बँकेची विश्वासार्हता आणि आर्थिक सक्षमता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवत असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment