Rain Update :राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तसेच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसारपुढील तीन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
सोबत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे.
