अबब! पतीसोबत कोर्टात आली ; प्रियकर दिसताच महिलेने मारली मिठी! नेमकं काय घडलं?

पीलीभीत (उत्तर प्रदेश) : न्यायालयात जुन्या खटल्याच्या कामासाठी पतीसोबत आलेल्या महिलेने कचहरीबाहेर प्रियकराला पाहताच त्याला मिठी मारल्याची घटना उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथे घडली. या प्रकारानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद आणि हाणामारी झाल्याने परिसरात गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टनकपूर रोडवरील पीलीभीत कचहरी परिसरात ही घटना घडली. महिला आपल्या पतीसोबत जुन्या खटल्याच्या कामासाठी न्यायालयात आली होती. याचवेळी तिथे एक तरुण आला. संबंधित तरुण आपला प्रियकर असल्याचे महिला सांगत असल्याची माहिती आहे. त्याला पाहताच ती त्याच्याजवळ गेली आणि सर्वांसमोर त्याला मिठी मारली.

या प्रकारामुळे घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. महिलेला तरुणापासून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ती त्याला सोडण्यास तयार नसल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये ओढाताण सुरू झाली आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

अखेर प्रियकरासोबत निघून गेली महिला

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मध्यस्थी केली. काही वेळ गोंधळ सुरू राहिल्यानंतर महिला संबंधित तरुणासोबत तिथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण काही नागरिकांनी मोबाईलमध्ये केले. ही घटना एक दिवस आधी घडल्याचे वृत्त असून, त्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. काही जणांनी वेगवेगळ्या गाण्यांसह संपादित केलेले व्हिडिओही शेअर केले.

दोन्ही बाजूंच्या लोकांवर पोलिसांची कारवाई

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली. सीओ सिटी अमरनाथ वर्मा यांच्याशी या घटनेबाबत संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थितीची आणि संबंधित व्यक्तींची माहिती घेतली. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही पक्षांतील लोकांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा प्रक्रियेशी संबंधित कलम १५१ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.

या घटनेमुळे पीलीभीत कचहरी परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment