हवामान विभागाचा अलर्ट, ‘या’ चक्रीवादळाच मोठं संकट

Cyclone : मोचा पाठोपाठ आणखी एका चक्रीवादळाचं संकट घोंघावत असल्याची माहिती मिळाली आहे. हे चक्रीवादळ नेमकं कोणतं आहे आणि ते कुठून येत आहे याची माहिती समोर आली आहे. या चक्रीवादळाचं नाव फॅबियन आहे.

त्याने दक्षिण हिंदी महासागरात धडक दिली असून हळूहळू ते किनाऱ्याकडे सरकत आहे. वाऱ्याचा वेळ प्रचंड आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या राज्यांना आणि ज्या देशांच्या सीमारेषा समुद्रकिनाऱ्या लगत आहेत त्यांनाही हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.

मोचा पाठोपाठ आता फॅबियन चक्रीवादळानं टेन्शन वाढवलं आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टनुसार, किनारपट्टीवर पोहोचण्यासाठी या वादळाला आणखी काही दिवस लागू शकतात. त्याचे दुष्परिणाम आतापासूनच दिसून येऊ लागले आहेत. एकीकडे कमालीची उष्णता वाढत आहे.

वाढत्या उष्णतेमुळे लोक हैराण झाली आहेत. तर म्यानमारमध्ये प्रचंड पाऊस, वादळी वारे यामुळे ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूर्वेकडील राज्यांमध्ये पाऊस आणि दिल्लीपासून खाली वाढत जाणारी उष्णता अशी स्थिती सध्या देशात पाहायला मिळत आहे.

सध्या तरी फॅबियन चक्रीवादळाचा भारतावर कोणता थेट परिणाम होणार नाही असं सांगितलं जात आहे. त्यामुळे भारतात मोठं नुकसान होणार नाही. आता याचा परिणाम मान्सूनवर होणार का? हे देखील पाहावं लागणार आहे.

Leave a Comment