अहमदनगर : कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर हल्ला करणार्या पिंपळगाव उज्जैनीच्या सरपंच पतीला भिंगार कॅम्प पोलिसांनी सात महिन्यांनंतर अटक केली आहे.
चांगदेव उर्फ भगवान गोवर्धन आढाव (वय 32) असे अटक केलेल्या सरपंच पतीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
20 ऑक्टोबर 2022 रोजी नगर तहसील कार्यालयातील कर्मचारी तहसीलदार यांच्या आदेशाने कापुरवाडी गावात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाईसाठी गेले होते.
तेथे पथकातील कर्मचारी यांच्या अंगावर धावून जाऊन फिर्यादीस व पथकातील कर्मचारी यांना धक्काबुक्की, शिवीगाळ, दमदाटी मारहाण करून कामात अडथळा निर्माण केला होता.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील पसार झालेला आढाव हा घरी आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
