जामखेडकडून नगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या मद्यधुंद पिकअप चालकाने दुचाकीसह रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलांना जोरदार धडक दिली. या अपघातात सासू-सूनेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
मद्यधुंद अवस्थेत असलेला टेम्पो चालक जामखेडकडून भरधाव वेगात नगरकडे निघाला होता. त्याचवेळी शेतातून लाकडे जमा करणाऱ्या महिला रस्त्याच्या कडेला जात होत्या.
टेम्पोने नगर-जामखेड रोडवरील निंबोडी गावाजवळ आला असता, चालकाने समोरून येत असलेल्या दुचाकीसह महिलांना जोरदार धडक दिली. या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोन्ही महिला सासू-सून आहेत.
वत्सला चांदणे आणि शकुंतला चांदणे असे या दोन्ही महिलांचं नाव आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या अपघातात एक युवक आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या जखमींवर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून धडक देणारा चालक टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, निंबोडी गावातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
