महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

नवी दिल्ली(DSNews24) निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याने संघर्ष वाढला आहे. त्यातच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात दोन आठवडे सलग सुनावणी घेण्यात आली.

मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत आपली बाजू मांडली होती. त्यानंतर या आठवड्यात शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करत बाजू मांडली.

यानंतर आज दुसऱ्या आठवड्यातील सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २ तासातच संपवली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलत पुढील सुनावणी १४ मार्चला होणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment