अबब.. सून अंगणात भांडी घासत होती, सासरा कुऱ्हाड घेऊन आला अन्….

कौटुंबिक वादातून रागाच्या भरात सासऱ्याने सुनेची हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास रोहना गावात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी सासरा सयाराम ईश्वरकर याला अटक केली आहे. सुनेचं नाव प्रणाली ईश्वरकर असं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रोहना इथं राहणारे सयाराम ईश्वरकर आणि सून प्रणाली ईश्वरकर यांच्यात सकाळी काही कारणामुळे भांडण झाले.

यातून वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात सासऱ्याने प्रणालीवर कुऱ्हाडीने वार केले. यात प्रणालीचा जागीच मृत्यू झाला.

प्रणाली घराच्या अंगणात भांडी धुत असताना सासरा सयाराम यांच्याशी वाद झाला. तेव्हा घरातील कुऱ्हाड घेऊन येत सयाराम यांनी तिच्या मानेवर वार केले.

हे घाव खोलवर होते. प्रणाली यानंतर रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडली. यावेळी अती रक्तस्राव झाल्यानं ती गतप्राण झाली. घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांनी दिली.

यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी सयाराम ईश्वरकरला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment