छत्रपती संभाजीनगर – गुन्हा दाखल होण्यापासून प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
इंदुरीकर महाराज यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी अवधी मागितला आणि तोपर्यंत गुन्हा दाखल करु नये अशी विनंती केली.
या विनंतीवरुन औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराज यांना चार आठवड्यात सुप्रीम कोर्टात जाण्यास मुदत दिली आहे. पुत्र प्राप्तीबाबत लिंगभेदासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला आहे. म्हणजेच इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने कायम ठेवले आहेत.
न्यायालयाच्या या निकालानंतर इंदुरीकरांच्या वकिलांनी खंडपीठात धाव घेत सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मुदत मागितली, सोबतच गुन्हा दाखल न करण्याची विनंती केली. ज्याला खंडपीठाने होकार दर्शविला आहे.
