महाराष्ट्रात काही भागात पाऊस झाला आहे, त्यानंतर एक वादळ येऊन गेलं. त्यामुळे सगळी जनता चिंतेत आहे की, मान्सून कुठे गेला.
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी एक भविष्यवाणी जाहीर केली होती की, महाराष्ट्र आणि इतर राज्यात 23 जूनपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. मुंबई आणि कोकणमध्ये काही भागात ढगाळ वातावरण अजून तुरळक पाऊस होत आहे. देशात वातावरण पूर्णपणे बदललं असून गर्मी अधिक वाढली आहे.
हवामान विभागाने माहिती दिली आहे की, महाराष्ट्रात अधिक गर्मी वाढली आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्रात हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडासहीत अनेक ठिकाणी वीजेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर नंदुरबार आणि जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि जवळच्या ठिकाणी पाऊस होणार असल्याचं सांगितलं आहे.
