उत्तर प्रदेश – गाझीपूर येथे नवऱ्या मुलाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव माहित नसल्याने नवरीने थेट लग्न मोडल्याची घटना घडली आहे. नसीरपूर गावातील शिव शंकर नावाच्या मुलाचं रंजनासोबत ठरलं होतं.
11 जून रोजी तो वरात घेऊन मुलीच्या घरी देखील पोहोचला होता. रात्री दोघांचे लग्न देखील झाले. मात्र, सकाळी एक विधी करण्यासाठी सगळे जमले असताना नवरीच्या बहिणीने काही प्रश्न विचारले.
यात नवरदेवाला देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले होते. मात्र मुलाला त्याचे उत्तर देता आले नाही. तसेच इतर प्रश्नांची ही नवरदेव उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे नवरीने थेट लग्नच मोडले. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. मुलीच्या कुटुंबी यांनी नवरदेवाची अधिक चौकशी केली असता तो गतीमंद असल्याचे समोर आले. यानंतर मुलीचे लग्न दिरासोबत लावून देण्यात आले.
याबाबत मुलाच्या वडीलांनी सांगितले की, आम्ही मुलीचं लग्न आमच्या मोठ्या मुलासोबत ठरवलं होतं. मात्र तिथे गेल्यावर मुलीने व तिच्या घरच्यांनी मुलगा गतिमंद असल्याचे सांगून लग्न करण्यास नकार दिला. तरी देखील आम्ही आमच्या लहान मुलासोबत लग्न लावले. आमच्या छोट्या मुलाचे वयदेखील मुली पेक्षा कमी आहे तरी आम्ही लग्न लावून देण्यासाठी तयार झालो.
लग्नानंतर मुलीच्या सुनेचे नातेवाईक घरी येऊन तिला जबरदस्ती घेऊन जात होते. तेव्हा मुलाच्या वडिलांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही कडील लोकांना पोलिस ठाण्यात बोलवलं. त्यानंतर दोन्ही पक्षाकडील लोकांनी एकमेकांसोबत चर्चा करुन प्रकरण सोडवले.
