दौंड तालुक्यातील वरवंड येथील डॉक्टरने पत्नीचा गळा दाबून खून केला. दोन मुलांना विहिरीत टाकून मुलांची हत्या करत स्वतः घरात गळफास घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 20) सायंकाळी उघडकीस आली.
डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42, रा. चैताली पार्क, वरवंड, ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून पत्नी पल्लवी अतुल दिवेकर (वय 39), मुलगा अद्वित (वय 9), मुलगी वेदांती (वय 6) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.
डॉ. अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून ही हत्या आणि आत्महत्या झाली आहे. आत्महत्या पूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली आहे. त्याचा तपशील पोलिसांना मिळाला आहे.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यासह यवत आणि पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे डॉ. अतुल दिवेकर यांनी गळफास घेतलेला तर पत्नी पल्लवी याचा गळा आवळला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
शेजारी शेतात काही अंतरावर असलेल्या विहिरीत वेदांतीचा मृतदेह रात्री उशिरा मिळाला तर अद्वितचा शोध सुरू आहे. अतुल आणि पल्लवी यांचा मृतदेह यवत ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यात आला असून तो पुढे जिल्हा रुग्णालयात ससून येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली जात आहे. यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शना खाली अधिकचा तपास यवत पोलीस करीत आहेत.
डॉ. अतुल दिवेकर यांची सुसाईड नोट
डॉ. अतुल दिवेकर हे जनावरांचे डॉक्टर आहेत आणि पत्नी श्री ‘गोपीनाथ माध्यमिक विद्यालय’ वरवंड याठिकाणी शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांनी लिहलेल्या सुसाईड नोट मध्ये “मी माझ्या बायकोच्या त्रासाला कंटाळून तिला मारून टाकले असून, एक मुलगा व मुलगी यांना जगताप यांच्या विहरीत मारून टाकले असून मी स्वतः आत्महत्या करत माझे जीवन संपवत आहे.” असे लिहिल्याचे समजते.
