Ahmednagar ; संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकुर जवळील बिरेवाडी येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त दि. 3 मार्च ते 10 मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
ब्रम्हलिन प.पु. माणिकगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व मठाधिपती ह.भ.प.दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह यंदा 53 वे वर्ष पुर्ण करत असून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आजपासून सप्ताहास प्रारंभ झाला आहे.
तसेच सप्ताह काळात काकडा भजन, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, जागर आदि दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.
तसेच मठाधिपती ह.भ.प दत्तगिरी महाराज, शिवाजी महाराज दाते, मारूती महाराज अनंत(गुरूजी), दिपक महाराज गुळवे, शांताराम महाराज जोरी, अमोल महाराज गांगुर्डे, उद्धव महाराज कोतवाल, दत्तात्रय महाराज भोर हे हरिकर्तनरुपी सेवा देणार आहे. तर ह.भ.प चत्तर महाराज शास्त्री यांच्या काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
सप्ताहात तन मन धनाने पठारभागातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे
