Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपला धक्का, यांचा ठाकरे गटात प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेनेतील बंडखोरीमुळे पक्षात निर्माण झालेल्या दोन गटात आरोप-प्रत्यारोप काही थांबता थांबत नाही. तर दोन्ही पक्षाकडून पक्षप्रवेशावर भर दिला जात आहे.

दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपला (BJP) मोठा धक्का देत शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश करण्यात आला.

तर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वात या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश केला असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वात आज मुंबई येथे शेकडो भाजप पदाधिकारी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून स्वागत केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. तर रोधकांच्या विरोधात लढा अधिक बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात जोमाने काम करू अशी ग्वाही या पदाधिकाऱ्यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, सागर शिंदे, रंगनाथ राठोड आदी उपस्थित होते.

यांचा झाला पक्षप्रवेश!

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका बबीता चावरिया, भाजपा माजी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन झवेरी, माजी मंडळ अध्यक्ष सुधीर नाईक, माजी युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष अमित घनगाव, माझी मंडळ उपाध्यक्ष योगेश अष्टेकर, माजी युवा मोर्चा सदस्य अजय चावरिया, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडे, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद धीवर, भाजपा मंडळ अध्यक्ष बाबासाहेब कारले, भाजपा माजी मंडळ उपाध्यक्ष बजरंग पाटील, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे मोहसीन खान, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी अध्यक्ष उत्तम अंभोरे तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुरुवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment