मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृषभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. गुरुकृपा लाभेल.
धनु : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
