नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कांद्याच्या आवकेत व भावातही वाढ झाली.
जवळपास 71 हजार गोण्या (70 हजार 932) आवक झाली. भाव जास्तीत जास्त 1600 रुपयांपर्यंत निघाले.
एक-दोन लॉटला 1400 ते 1600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1200 ते 1300 रुपये, मुक्कल भारी 1000 ते 1150 रुपये, गोल्टा 800 ते 900 रुपये, गोल्टी 500 ते 700 रुपये, जोड 200 ते 400 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला शंभर ते अडीचशे रुपयांपर्यंत भाव मिळाला.
