नाशिक, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर भागात पुढील दोन दिवस म्हणजेच दि. 29,30 जून व दि.1 जुलैला जळगाव, धुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल.
नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार घाट माथ्यावर तीव्र स्वरूपाचा म्हणजेच 60 ते 70 मिमी पाऊस होईल आणि पूर्वेकडील भागात 40 ते 50 मिमी पाऊस होईल.
काही भागात मध्यम पाऊस होईल. दि.1 ते 4 जुलै या काळात राज्यातील अंतर्गत भागात वळिव पाऊस अधून मधून सक्रिय होईल. दि.4 ते 6 जुलै विदर्भ आणि लगतच्या मराठवाडा भागात वळिव जोरदार पाऊस होईल.
दि.28 जून ते 1 जुलै या काळात राज्यात मान्सून सक्रिय राहील.या काळात विजांचा पाऊस कमी होऊन मान्सूनचा पाऊस सुरू होईल. या काळात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रचा घाटाचा भाग आणि लगत जोर अधिक राहील,अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
